गोफण
कोंबड्यानं दिली बांग
जागा झाला सारा गाव
बापावाणी पाखरांची
दिसे शेताकडे धाव
भल्या पहाटे निघतो
पिकाचिया राखणिला
हाती घेऊनी न्याहरी
गळा टाकी गोफणिला
नजरेत भरतोया
दाणा कणिसाचा भारी
पाखरांच्या थव्यांसाठी
त्याची रंगतच न्यारी
रंगत लुटण्याला सज्ज
झाली पाखरांची टोळी
करू पाहती चोचीनं
त्याच्या सपानाची होळी
लई फुलवावा मळा
त्याच्या डोयाचं सपान
मुखी देऊनी भल्लरी
हाती फिरवी गोफण
गोफणिच्या दगडाने
खगा होऊ नये पिडा
हाती हलक्या भिरवी
बाप गोफणिचा खडा
भोळ्या बापाची कहाणी
अ ड कली गोफणित
घेते गोफण विसावा
पिकाचिया कापणीत
दि.२२/०२/२०१७
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
9592487310
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें